Description
औपचारिक रीत्या महानुभाव संप्रदायाचे अनुयायी नसलेल्या सर्व लोकांनी श्री चक्रधरस्वामींचा हा महान वारसा नीट जाणून घ्यावा, कृतज्ञतापूर्वक त्याचं स्मरण करावं आणि तो आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा, असं विनम्र आवाहन मी सर्वांना करू इच्छितो. त्याबरोबरच, जे औपचारिक रीत्या श्री चक्रधरांच्या महानुभाव पंथाचे अनुयायी आहेत, त्यांनीही श्री चक्रधरांचा अशा प्रकारचा उपदेश स्वतःच्या आचरणात आणण्याबरोबरच तो व्यापक समाजहितासाठी संप्रदायाच्या बाहेर असलेल्या लोकांपर्यंत विधायक पद्धतीनं पोचवण्यासाठी अधिक क्रियाशील व्हावं, सातत्यानं व चिकाटीनं शक्य ते सर्व प्रयत्न करावेत आणि आपल्या समाजाच्या प्रकाशमय भवितव्यासाठी आपलं योगदान द्यावं, अशी अपेक्षा या प्रसंगी मी पुन्हा एकदा विनम्रपणे व्यक्त करू इच्छितो.
जनां जोडण्याचा । हृदयस्थ हेतू । समतेचे सेतू । चक्रधर ।।
स्वीकारू समता । राहूनी कृतज्ञ । होऊ सर्व सुज्ञ । आनंदाने ।।
डॉ.आ.ह.साळुंखे






Reviews
There are no reviews yet.