Description
स्त्रियांची प्रतिभाशक्ती : अंत:शक्ती फुलल्यामुळे एकूण मानवजातीचे कल्याणच होईल. स्त्रियांची सर्जनशीलता केवळ अपत्यनिर्मितीपुरती मर्यादित न ठेवता जीवनाच्या विविध क्षेत्रांत स्त्रियांना कर्तृत्वाची उंच शिखरे गाठण्यासाठी संधी द्यावी, हे एकूण मानवजातीच्या हिताचे आहे, असे कळकळीचे आवाहन ते करतात. स्त्रियांच्या संदर्भातील धर्माची व धर्मग्रंथांची भूमिका समजण्यास वरील विवेचनावरून मदत होईल. धर्मग्रंथांची कठोर चिकित्सा करून याविषयीची वस्तुस्थिती वस्तुनिष्ठ स्वरूपात डॉ. साळुंखे यांनी आपणांसमोर ठेवली आहे.
धर्मशास्त्रांनी स्त्रियांविषयी व्यक्त केलेले विचार, पौराणिक कथांमधून गौरविण्यात आलेले स्त्रियांचे आदर्श, सुसंस्कृत म्हणून स्त्रियांचे प्रशंसिलेले गुण, या सर्वांमागे पुरुषी राजकारण आहे. त्याला सांस्कृतिक संदर्भ आहे. त्याच्या अनेक अदृश्य बाजू दृश्यमान करण्याचे आणि त्यांचा अभ्यासपूर्ण प्रतिवाद करण्याचे कार्य डॉ. साळुंखेंनी अनेक ग्रंथांमधून केले आहे. समाजात स्त्रियांविषयी प्रचलित असणाऱ्या धारणांची निर्मिती व त्यांचे प्रचलन कसे झाले, याचे विश्लेषण त्यांनी केले आहे.






Reviews
There are no reviews yet.