Description
‘गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो’ या पुस्तकाचे पुनर्मुद्रण आपल्या हाती देत आहे. धार्मिक स्वातंत्र्याची उत्कट आकांक्षा, ही या पुस्तकाच्या लेखनामागची माझी मुख्य प्रेरणा होय. आता, धार्मिक स्वातंत्र्य हवे असेल, तर धर्मचिकित्सा करणे अत्यावश्यकच नव्हे, तर अपरिहार्य आहे, अशी माझी भावना आहे. ही धर्मचिकित्सा धर्माच्या आधारे इतरांवर गुलामगिरी लादणाऱ्यांनीही करावी, म्हणून मी त्यांच्या विवेकाला आवाहन करीत आहे. पण त्याबरोबरच ही चिकित्सा धर्माच्या आधारे गुलामगिरीत अडकलेल्या लोकांनीही करावी, म्हणून मी त्यांच्या स्वत्वाला आवाहन करीत आहे. कोणाविषयी द्वेषभावना भडकावून द्यावी, असेही माझ्या मनात नाही आणि कोणाचा तेजोभंग करण्याचा उद्देशही या लेखनामागे नाही. मानवी स्वातंत्र्याची खरीखुरी उद्घोषणा आणि कार्यवाही व्हावी, या हेतूने हे छोटेसे पुस्तक आपल्या हाती दिले आहे.
आ. ह. साळुंखे






Reviews
There are no reviews yet.