मिथक साहित्य व संस्कृती/ Mithak : Sahitya V Sanskruti

280.00

मानवाच्या उदय व विकासात मिथकांनी मोठीच मदत केली आहे, यात शंका नाही. तार्किक पातळीवर न टिकणारी व चुकीच्या कार्यकारणभावावर आधारलेली मिथके धर्मग्रंथांमध्ये ‘पवित्र कथा’ म्हणून स्थिरावली. त्यामुळे धार्मिक विधीचा भाग म्हणून त्यांना मान्यताही मिळाली. अनेक विधींच्या स्पष्टीकरणासाठीही मिथके रचली गेलीत.

 

Pages: 192

Description

डॉ. अशोक राणा हे कित्येक वर्षांपासून मिथकांचा विविधांगी अभ्यास करीत आले आहेत. या विषयाचा त्यांचा व्यासंग दांडगा आहे. या व्यासंगाचे एक नवे फळ म्हणून त्यांचा ‘मिथक: साहित्य व संस्कृती’ हा नवा ग्रंथ लोकायत प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. या ग्रंथाचे संपादन डॉ. संजीव कोंडेकर आणि डॉ. प्रशांत राऊत या अभ्यासकांनी केले आहे. ‘वैदिक वाङ्मयातील धर्माचा उगम आणि विकास’ हा आपला संशोधनपर प्रबंध डॉ. पंजाबराव देशमुख यांनी १९२६ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाला सादर केला होता. त्या कार्याची शताब्दी साजरी करण्याचा प्रारंभ म्हणून हा ग्रंथ त्यांच्या स्मृतीला अर्पण करण्यात आला आहे, ही कृतज्ञतेची भावना मला खूप भावली. डॉ. राणा यांचा हा व्यासंगपूर्ण आणि विश्लेषणात्मक ग्रंथ मराठी साहित्याला एक मोठे योगदान ठरेल, असा मला विश्वास वाटतो.

डॉ. आ. ह. साळुंखे

Additional information

Weight 0.200 kg
Pages

192

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मिथक साहित्य व संस्कृती/ Mithak : Sahitya V Sanskruti”