चिलबल/ Chilbal

250.00

ग्रामजीवन आणि परंपरा, गाव आणि शिवार, गुरं-ढोर आणि पशूपक्षी, निसर्ग आणि शेती, ग्रामसंस्कृती आणि माणूसपणं इ. सर्व कालचं आणि आजचं याचा दस्ताऐवज मातीच्या मूळ गाभ्याशी संवाद साधून एक नवा आयाम चिलबल’ मध्ये शब्दबद्ध झाला आहे. या सर्वांचा विशालपट म्हणजे ‘चिलबल. जुन्याचा नव्याने घेतलेला शोध आणि संपत चाललेल्या ग्रामीण शब्दाचा ‘रांजण’ म्हणजेच ‘चिलबल’.

SKU: lokayat0118 Category: Tag: Brand:

Pages: 176

Description

आनंद पवार यांचे ‘चिलबल’ हे पहिलं पुष्प ललितगद्य स्वरूपात येत आहे. आनंद पवार हा मूळात संवेदनशील आणि हळव्या मनाचा भला माणूस आहे. त्याचे हे हळवेपण ‘चिलबल च्या रूपाने आलं आहे. नकळत्या वयात त्याच्या जीवनात पोरकेपण आणि परकेपण आलं. पोटासाठी संघर्ष सुरू झाला. भाकरी, पोट आणि जगणं एकीकडे आणि माणूस, निसर्ग, गुरं-ढोरं, गावशिवार दुसरीकडं असं जगणं सुरू झालं, या जगण्यातून आनंद पवार यांनी माणूसपणाचा शोध घेतला. त्यांच्या बालपणीच्या आठवणी, त्या आठवर्णीची साठवण म्हणजेच ‘चिलबल’. तुटलेलं नव्यानं जोडणं म्हणजेच ‘चिलबल’, मोडून पडलो, संपलो असे न म्हणता स्वतःला सावरून नव्याने उभं राहाणे म्हणजेच ‘चिलबल’.

विझत आणि पुसत चाललेल्या ग्रामसंस्कृतीचा ओलावा त्यांच्या लेखणीतून नवा आयाम उभा करतो आहे. आँध जि. सातारा या परिसरातील प्रादेशिक भाषेचा वापर त्यांनी केला आहे. या भाषेला मूळातच एक लय आणि गोडवा आहे, त्याच बरोबर विनम्रता देखील शब्दांशब्दातून पाझरताना आढळते.

 

Additional information

Weight 0.200 kg
Pages

176

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चिलबल/ Chilbal”