तथागत बुद्ध आणि संत तुकाराम/ Tathagat Buddha Aani Sant Tukaram

250.00

माता यथा नियं पुत्तमायुसा एकपुत्तमनुरक्खे । एवम्पि सब्बभूतेसु, मानसं भावये अपरिमाणं ।।

अर्थ : आई ज्याप्रमाणे आपले आयुष्य पणाला लावून आपल्या एकुलत्या एक पुत्राचे रक्षण करते, त्याप्रमाणे सर्व प्राण्यांविषयी आपल्या मनात अपरिमित भावना असावी.

तथागत बुद्ध

बैसोनि निवांत शुद्ध करी चित्त ।

तया सुखा अंतपार नाही ।। १७३३.१।।

संत तुकाराम

Pages: 152

Description

उन्नत मनुष्यत्वाकडचा प्रवास…

धर्मानंद कोसंबींची तरुणपणीच संत तुकारामांशी वैचारिक भेट झाली आणि तुकाराम कोसंबींच्या दृष्टीने त्यांना बुद्धांकडे घेऊन जाणारा सेतू ठरले.

तुकारामांचे बुद्धांशी असलेले अतिशय निकटचे सांस्कृतिक नातेच या घटनेला कारणीभूत झाले. बुद्धांनी माणसाच्या मनाला पूर्वी कधीही कोणीही दिले नसेल इतके सौंदर्य दिले, सुगंध दिला. तुकारामांनीही कधी बुद्धांचे अनुसरण करीत, तर कधी स्वतंत्रपणे आणि स्वयंस्फूर्तीने मानवी मनाला सुंदर आणि सुगंधी बनविले. तथागत बुद्ध हे भारतीय संस्कृतीच्या क्षितिजावरचे सर्वांत अधिक प्रसन्न व आनंददायक स्मित आहे आणि संत तुकाराम हा भारतीय समाजव्यवस्थेला अतिशय निर्मळ बनविणारा प्रवाही व तृषाशामक निर्झर आहे! या दोघांपुढे नतमस्तक होणे आणि त्यांना आपल्या हृदयात व मस्तकात धारण करणे म्हणजे उन्नत मनुष्यत्वाकडचा प्रवास सुरू करणे होय !

Additional information

Weight 0.170 kg
Pages

152

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “तथागत बुद्ध आणि संत तुकाराम/ Tathagat Buddha Aani Sant Tukaram”