Description
विद्रोह
विद्रोह म्हणजे प्रस्थापितांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी वंचितांनी केलेले सर्वांगीण स्वातंत्र्ययुद्ध होय. विद्रोह म्हणजे आपल्या श्वासोच्छ्छ्रासांवरची, आपल्या नाडीच्या ठोक्यांवरची, आपल्या स्वत्वावरची, किंबहुना आपल्या एकूण अस्तित्वावरची अनिष्ट बंधने तोडणे, आपल्याला गुदमरवून टाकणारी दडपणे झुगारून देणे होय…. कोणावर सूड उगवणे, कोणाचा द्वेष करणे, कोणाला त्याच्या न्याय्य स्थानापासून खाली खेचून पायदळी तुडवणे, यासाठी हा विद्रोह नाही. हा विद्रोह आमच्या स्वत्वाच्या आविष्कारासाठी आहे. आमच्या उमलण्यावर लादण्यात आलेली बंधने तोडण्यासाठी आहे. आमच्या विकासाभोवती आलेली बंधने तोडण्यासाठी आहे…. आपल्यालाही बोलण्यासाठी जीभ आहे, लिहिण्यासाठी हात आहेत आणि विचार करण्यासाठी मेंदू आहे. या सगळ्यांच्या जोरावर आपली सर्जनशीलता… पणाला लावून आपणच आपले देखणे विश्व निर्माण करू या.
कुणबी – मराठा समाजाला आवाहन
केवळ प्रस्थापित ‘जहागीरदार’ म्हणजे अख्खा मराठा समाज नव्हे. मराठा समाजात ‘रंजल्या-गांजल्या’ लोकांची संख्या अशा प्रस्थापित मराठ्यांपेक्षा किती तरी पटींनी अधिक आहे…. आपलं संघटन आत्मविकासासाठी आणि दुबळ्यांना आधार देण्यासाठी आहे…. मराठा समाजाला दूर ठेवून प्रबोधन यशस्वी होणार नाही…. भाषेवर प्रभुत्व प्राप्त करू या…. बौद्धिक आव्हानं स्वीकारण्यास सज्ज होऊ या…. मुलींनो, तुम्ही वडाला फेऱ्या मारण्याऐवजी संगणकाला तुमच्या भोवती फेऱ्या मारू द्या…. कुणबी पालकांनो, म्हशीला योग्य वेळी वैरण घालता, तशी ‘वैरण’ आपल्या मुलांच्या मेंदूला मिळते का, ते पहा. मुलांनो, जमिनीत दडपलेलं बी जसं चैतन्यानं सळसळून अंकुरतं आणि आकाशात झेपावतं, तशी झेप घ्या. आपण आपल्या स्वतःच्या खऱ्याखुऱ्या परंपरेचा शोध घेऊ या…. स्वतः फुलू या आणि अवघ्या मानवजातीला मधुर-मधुर बनवून टाकू या !
संस्कृतीचा विचारवेध
जो समाज आपल्या मुलांची मने घडविण्याची जबाबदारी आपल्या शोषणकर्त्यांवर सोपवितो, तो समाज सांस्कृतिक दृष्ट्या कधीही स्वतंत्र होऊ शकत नाही… आपल्याला आपल्या सांस्कृतिक इतिहासाचे पुनर्लेखन तर करावे लागेलच, पण आपल्या मनांची, बुद्धींची, दृष्टिकोणांची, स्वत्व-परत्वांची, मित्रत्व-शत्रुत्वांची सांस्कृतिक दृष्ट्या नवी रचना करावी लागेल….. अनिष्ट गोष्टी उखडून फेकणे पुरेसे नाही, भावात्मक-रचनात्मक क्रियात्मक असे नवे पर्याय देऊ या….. आपण आपल्या ऱ्हासाची, अवनतीची, पराभवाची, दारिद्र्याची, अनारोग्याची, विषमतेची आणि अज्ञानाची कारणे निर्भयपणे शोधून दूर केली पाहिजेत. शंभर कोटी लोकांचे मेंदू पूर्ण उमलू दिले पाहिजेत. मेंदूच्या शेतात पिकत नाही, असा एकही पदार्थ या जगात नाही. शंभर कोटी लोकांच्या शंभर टक्के अंतःशक्तींचा संपूर्ण आविष्कार करण्यासाठी रात्रंदिवस झटू या.






Reviews
There are no reviews yet.