ऐतरेय ब्राह्मण : एक चिकित्सा /Aitareya Brahman: Ek Chikitsa

120.00

ऐतरेय ब्राह्मण हा भारतातील वैदिक लोकांच्या वेदवाङ्‌मयातील एक ग्रंथ होय. वेदवाङ्‌मयामध्ये वेदांच्या चार संहिता, ब्राह्मण नावाचे ग्रंथ. आरण्यक नावाचे ग्रंथ आणि उपनिषदे यांचा अंतर्भाव होतो.

SKU: lokayat0017 Category: Tag: Brand:

Pages: 80

Description

आपण ‘आपण’ आहोत !

आपण ‘आपण’ आहोत, हे भान किती स्वाभिमानाचे आहे, किती आनंद देणारे आहे ! ते कसे आपणांस रोमांचित करून टाकणारे आहे ! याउलट आपण ‘आपण’ नसून दुसरेच कुणी तरी आहोत किंवा दुसऱ्या कुणाची तरी छाया आहोत, ही जाणीव आपल्या अस्तित्वाच्या देठालाच कुरतडणारी आहे.

म्हणूनच, अब्राह्मणांना माझी कळकळीची विनंती आहे, की जीवनाच्या सर्व क्षेत्रांतून उत्तुंग झेप घ्या, असामान्य कर्तृत्व गाजवा, पण तुम्ही ‘तुम्हीच’ आहात, हे कधीही विसरू नका. त्या कर्तृत्वाने तुमचा चेहरा – तुमचा स्वतःचा चेहरा, तुमच्या स्वकीयांचा चेहरा उजळून निघू द्या. दुसऱ्या कुणाच्या चेहऱ्याआड स्वतःचा चेहरा लपवू नका, तुमच्या कर्तृत्वावर दुसऱ्या कुणाची मुद्रा उमटवू देऊ नका. स्वतःचे कर्तृत्व स्वतःचे म्हणून अत्यंत नम्रपणाने, पण तितक्याच ठामपणाने मिरवा. त्याचे श्रेय भलत्यासलत्यांना देऊ नका. आपण विशिष्ट क्षेत्रात कर्तृत्ववान झालो, म्हणजे ‘ब्राह्मण’ झालो, असे म्हणून स्वतःला आणि आपल्या रक्तामांसाच्या लोकांना कमीपणा आणू नका.

 

Additional information

Weight 0.100 kg
Pages

80

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ऐतरेय ब्राह्मण : एक चिकित्सा /Aitareya Brahman: Ek Chikitsa”