मित्रांना शत्रू करू नका !/ Mitraana Shatru Karu Nakaa

100.00

मित्रांना शत्रू करू नका !’ ही परिवर्तनाच्या चळवळींतील कार्यकर्त्यांना माझी अंतःकरणापासूनची विनंती म्हणा, वा ‘प्रार्थना’ म्हणा, आहे. पस्तीस-चाळीस वर्षं अशा अनेक चळवळींच्या संपर्कात राहिल्यानंतर माझ्या मनानं अगदी कळवळून ही प्रार्थना केली आहे. कारण, आपल्यापैकी अनेक जण मित्रांना शत्रू करण्याच्या कलेत अत्यंत कुशल, प्रवीण, निपुण, तरबेज, पारंगत, सिद्धहस्त, चतुरस्र, अष्टपैलू, पटाईत, वाकबगार, कर्तबगार, धुरंधर आहेत, असं मी पुनःपुन्हा पाहिलं आहे. हा मार्ग आपल्या नव्हे, तर आपल्या विरोधकांच्या यशाकडं घेऊन जाणारा आहे, असं स्पष्ट दिसत असल्यामुळं मी हे आपल्यापुढं ठेवत आहे.

SKU: Lokayat0031 Category: Tag: Brand:

Pages: 92

Price: Rs 100

Description

समजा, दहा हजार फूट उंचीचा एक पहाड आहे. त्याच्या पायथ्यापासून वीस किलो वजनाची साखरेची एक गोणी आपल्याला त्याच्या शिखरापर्यंत घेऊन जायची आहे. त्यासाठी आपल्याला खूप श्रम करावे लागतील. किती तरी वेळ द्यावा लागेल. चिकाटीनं आणि आशावादी आत्मविश्वासानं सगळा चढ चढावा लागेल. त्यानंतरच आपण ती गोणी शिखरावर पोचवू शकू. आता, ती गोणी तिथून दहा हजार फूट खाली टाकायची असेल, तर मात्र यातलं काहीही आवश्यक नाही. तिला थोडंसं ढकललं, की ती क्षणार्धात आपोआप खाली कोसळते. मैत्रीसारख्या नात्यांचंही असंच आहे. ती जोडायला, वाढवायला, जपायला खूप खूप काही आवश्यक असतं. ती मोडायला, संपवायला एखादा शब्द, एखादं पाऊल, एखादा क्षण पुरेसा होतो. ती जपली, तर जीवनाचा जमाखर्च फायद्याचा, नाही तर … ?

Additional information

Weight 0.120 kg
pages

92

price

Rs 100

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मित्रांना शत्रू करू नका !/ Mitraana Shatru Karu Nakaa”